धनबाद शहरातील गोल्फ ग्राऊंडवर नुकताच आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात जगप्रसिद्ध कलाकार (वूड आर्टिस्ट) बिरेंद्र ठाकुर यांच्या अनोख्या कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या. ठाकुर हे वूड कोलाज कलेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनोख्या पद्धतीच्या फ्रेम्स तयार केल्या असून त्यापैकी एक प्रेम 3 कोटी 99 लाख रुपयांना अर्थात जवळपास 4 कोटी रुपयांना विकली गेली. ती विकत घेणाऱयाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण एवढय़ा महाग किमतीची प्रेम त्याने कशासाठी घेतली, हा प्रश्न मात्र ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. ठाकुर यांच्या म्हणण्यानुसार कलाप्रेमी लोक त्यांची कलासक्ती दर्शविताना पैशांचा विचार करत नाहीत. त्यामुळे ही फ्रेम घेण्यात आली असावी.

त्यांच्या स्टॉलवर दुर्गामाता, भगवान गणेश, गौतम बुद्ध, विवेकानंद आदी अनेक मान्यवर व्यक्ती तसेच देवदेवतांच्या वूड कोलाज होत्या. पण कोणत्याही कलाकृतीची किंमत सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नव्हती. तरीही त्यांची धडाक्मयाने विक्री झाली. गेली बारा वर्षे ते या कोलाजची निर्मिती करीत आहेत. उत्तम प्रकारचे लाकूड वापरल्याने या कोलाजचा टिकावूपणा पिढय़ान् पिढय़ांचा असतो. त्यामुळे त्यांना एवढी किंमत येते, असे त्यांचे म्हणणे आहे.









