ऑनलाइन टीम / भोपाळ :
जेएनयूमधील भेटीनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोनला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. दीपिका पादुकोन हिला भाजप नेते आणि समर्थकांकडून ट्रोल करण्यात आले. दीपिकाचा छपाक आज प्रदर्शित झाला. तर, दुसरीकडे अजय देवगनचा तान्हाजी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे. मात्र, दुसरीकडे या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनात राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना छपाक चित्रपट दाखविण्यासाठी संपूर्ण थेअटरच बुक केलं आहे. तर, दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांकडून अजय देवगनच्या तान्हाजी चित्रपटाची तिकीटे फ्रीमध्ये वाटण्यात आली. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट फ्रीमध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्येही युवक काँग्रेसकडून छपाक चित्रपटाची तिकिटे फ्रीमध्ये वाटण्यात आली आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.









