ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये दहशतवाद्यांनी थेट पोलीस ठाण्यात घुसखोरी करुन एका महिला अधिकाऱ्याचा गळा चिरल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेनंतर दहशतवादविरोधी पथकाने काही मिनिटातचं एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्यानंतर पोलिसांनी पॅरिसच्या सर्व सीमा बंद केल्या असून, फरार दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.
कट्टरपंथी इस्लामी तत्वांना लगाम घालण्यासाठी फ्रान्सने कठोर पावले उचलल्याने या देशात हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. दहशतवाद्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही मागे हटणार नाही, त्यांना वेळीच उत्तर मिळेल, अशा शब्दांत पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी कट्टरपंथीयांना इशारा दिला आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रोन यांनीही या हल्ल्याचा निषेध करत आम्ही दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकणार नाही. हा दहशतवाद कडवा प्रतिकार करुनच समूळ नष्ट करू, असे कट्टरपंथीयांना बजावले आहे.









