ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये ॲस्ट्राझेनेकाचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस फायझर-बायोएनटेक किंवा मॉडर्नाचा देण्यात येणार आहे. ॲस्ट्राझेनेका लसीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, 55 वर्षाखालील वयोगटासाठी हा निर्णय आहे.
ॲस्ट्राझेनेकाची लस केवळ 55 वर्षांवरील व्यक्तींनाच देण्यात यावी, अशी शिफारस यापूर्वीच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने केली होती. 55 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना या लसीचा त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे 55 वर्षाखालील व्यक्तींनी पहिला डोस ॲस्ट्राझेनेकाचा घेतला असेल तर दुसरा डोस फायझर-बायोएनटेक किंवा मॉडर्नाचा घ्यावा, असे फ्रान्स आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जवळपास 5 लाख 33 हजार नागरिकांना दुसरा डोस वेगळ्या लसीचा देण्यात येणार आहे.









