ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्सच्या लायन शहरात ग्रीक परंपरावादी फादरवर चर्चच्या बाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात फादर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सरकारी वकील नकोलस जैक्वेट यांनी यासंदर्भात सांगितले की, लायन शहरात स्थानिक प्रमाणवेळेनुसार, संध्याकाळी 4 वाजता चर्चबाहेर फादरवर दोन वेळा गोळीबार करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे समजू शकले नाही.
एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोराने हंटिंग रायफलचा वापर केला होता. मात्र, संशयिताकडे कोणतेही हत्यार सापडले नाही. फ्रान्समध्ये मागील 72 तासातील ही गोळीबाराची दुसरी घटना आहे.









