ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समधील कोरोना रुग्णसंख्या 25 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या देशात आतापर्यंत 24 लाख 90 हजार 946 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 61 हजार 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी फ्रान्समध्ये 11 हजार 795 कोरोना रुग्ण आढळून आले. तर 487 जणांचा मृत्यू झाला. 24.90 रुग्णसंख्येपैकी 1 लाख 86 हजार 058 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 22 लाख 43 हजार 186 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2728 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. येथे आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 55 हजार 897 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 86 लाख 84 हजार 628 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 3 लाख 30 हजार 824 जणांचा मृत्यू झाला आहे.









