ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 10 लाख 41 हजार 075 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 34 हजार 508 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शुक्रवारी दिवसभरात फ्रान्समध्ये 42 हजार 032 कोरोना रुग्ण आढळून आले. तर 298 रुग्णांचा मृत्यू झाला. 10.41 लाख बाधितांमधील 1 लाख 9 हजार 486 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 लाख 97 हजार 081 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2441 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत फ्रान्सचा जगात सातवा क्रमांक लागतो.फ्रान्समध्ये 1 कोटी 44 लाख 06 हजार 499 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.









