मालीमध्ये 50 दहशतवादी ठार : अल-कायदाच्या विरोधात कारवाई
वृत्तसंस्था/ पॅरिस
मालीमधील दहशतवादी तळांवर फ्रान्सने एअरस्ट्राइक केला आहे. या कारवाईत अल-कायदाचे सुमारे 50 दहशतवादी मारले गेल्याचा दावा आहे. 4 दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे, तर एक आत्मघाती जॅकेट जप्त करण्यात आले आहे. अल-कायदाचे दहशतवादी सैन्याच्या तळावर हल्ला करू पाहत होते. बुर्किना फासो आणि नायजरच्या सीमेनजीक प्रेंच ड्रोनला दुचाकींवरील एक ताफा दिसून आला असता तेथे दोन मिराज विमानांनी क्षेपणास्त्रs डागण्यात आल्याची माहिती फ्रान्सच्या सैन्याचे प्रवक्ते कर्नल प्रेडरिक बार्बरी यांनी दिली आहे.
अत्यंत महत्त्वाची मोहीम 30 ऑक्टोबर रोजी साकारण्यात आली आहे. यांतर्गत 50 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs अन् स्फोटके हस्तगत करण्यात आल्याचे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी म्हटले आहे.
आयएस विरोधातही मोहीम
मालीमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांची शाखा ‘इस्लामिक स्टेट इन ग्रेटर सहारा’च्या विरोधातही एक मोहीम चालविली जात आहे. या मोहिमेत 3 हजार सैनिक सामील आहेत. ही मोहीम सुमारे एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली होती. याचे निष्कर्ष लवकरच मांडले जाणार असल्याचे सैन्याचे प्रवक्ते बार्बरी यांनी सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता मोहिमेच्या अंतर्गत मालीमध्ये 13 हजार सैनिकांना तैनात केले आहे. तर फ्रान्सने या भागात 5,100 सैनिकांना तैनात केले आहे.
फ्रान्समध्ये धार्मिक संघर्ष
धार्मिक संघर्षामुळे दोन आठवडय़ांमध्ये झालेल्या हल्ल्यांनी फ्रान्सला हादरवून सोडले आहे. सर्वप्रथम शिक्षकाची त्याच्याच विद्यार्थ्याने हत्या केली होती. त्यानंतर नीस शहरातील चर्चबाहेर चाकूने वार करून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. शनिवारीही एका अज्ञात बंदुकधाऱयाने चर्चमध्ये पाद्रीला गोळय़ा घातल्या होत्या. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे सरकारने फ्रान्समध्ये तैनात सैनिकांची संख्या दुप्पट केली आहे.









