ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना लढाईसाठी फ्रान्सने भारताला व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग किटची मदत केली आहे. आजच या वस्तू विमानाने भारतात पोहचतील. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
धोरणात्मक भागीदार म्हणून फ्रान्स आणि भारत कोरोना विषाणूविरूद्ध एकत्र काम करत आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतीच कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला वैद्यकीय उपकरणांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. फ्रान्सला भारताने कठीण काळात औषधांची मदत केली. त्यामुळे फ्रान्सही भारताला वैद्यकीय मदत करत आहे. मोदींनी फ्रान्सचे आभार मानले आहेत.
फ्रान्स भारताला 50 ओसीरिस -3 व्हेंटिलेटर, 70 युवेलचे 830 व्हेंटिलेटर, 50 हजार IgG/IgM टेस्ट किट, 50 हजार नाक आणि घशाचे स्वॅब मदत म्हणून देणार आहे. फ्रान्सचे एअरफोर्स ए-330 एमआरटीटी विमान ही वैद्यकीय मदत घेऊन आज भारतात दाखल होईल.









