नवी दिल्ली
वॉलमार्ट समूहाची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे मार्फत मोबाइल रिचार्ज करू पाहणार असाल तर आता सावध व्हा. कारण रिचार्ज करणे महाग पडणार आहे. 50 रुपयांपेक्षा जास्तीचे रिचार्ज केल्यास 1 ते 2 रुपये प्रक्रिया शुल्क घेतले जाणार आहे. देवाण घेवाणीच्या व्यवहारात शुल्क आकारणारी फोन पे ही पहिली डिजिटल पेमेंट कंपनी आहे. इतर कंपन्यांप्रमाणे फोन पे पेडिट कार्डच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारावर प्रक्रिया शुल्क आकारत आहे. 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज करणाऱयांना शुल्क बसणार आहे. पण त्यावरील 100 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये व त्यावरील रिचार्जवर 2 रु. शुल्क आकारले जात आहे.









