बेंगळूर
डिजिटल देवाण-घेवाणीच्या व्यवहारात कार्यरत फोन पेने 25 कोटीहून अधिक वापरकर्त्यांची संख्या पार केली आहे. ही एक मोठी कामगिरी फोन पेने केली असल्याचे समजते. कंपनीकडे ऑक्टोबरपर्यंत 10 कोटी सक्रीय मासिक वापरकर्ते होते. फोन पेचे संस्थापक आणि सीईओ समीर निगम यांनी डिसेंबर 2022 पर्यंत वापरकर्त्यांची संख्या 50 कोटी इतकी करण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले असल्याचे सांगितले. ऑक्टोबरमध्ये कंपनीने विक्रमी 92.5 कोटी देवाण-घेवाणीचे व्यवहार केले आहेत. युपीआयच्या माध्यमातून ऑक्टोबरमध्ये 83.5 कोटी देवाण-घेवाण व्यवहार झाले आहेत.









