नवी दिल्ली
डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म क्षेत्रातील ‘फोन पे’ ने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टसोबत भागीदारी केली असल्याचे सांगण्यात येते. ऑनलाइन ग्राहकोपयोगी व इतर वस्तुंसाठी ग्राहकांचा भर हा फ्लिपकार्टवर अधिक दिसतो. पे ऑन डिलिव्हरी या सेवेसाठी दोघांची भागीदारी झाली असून यायोगे संपर्काविना ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम अदा करणे सहजसाध्य होणार आहे. डिजिटल पेमेंटची वाढती लोकप्रियता पाहूनच ‘फोन पे’ने फ्लिपकार्टशी भागीदारी केली आहे.









