ऑनलाईन टीम / मुंबई :
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर राजकीय फायदा करुन घेण्यासाठी केला होता. अशा तक्रारी आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
याप्रकरणी चौकशीसाठी दोन वरिष्ठ अधिकाऱयांची समिती नेमण्यात आली आहे. तसेच या समितीचा चौकशी अहवाल सहा आठवडयात दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
देशमुख म्हणाले, या समितीमध्ये गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग, एसआयडीचे सहआयुक्त अमितेशकुमार या दोघा वरिष्ठ अधिकाऱयांचा समावेश असणार आहे. यासंबंधी इस्रायलला जे लोक गेले होते त्यांच्यासह अन्य सर्व गोष्टींची चौकशी करून समिती ६ आठवडय़ात अहवाल देण्यात येईल.









