कंपनीचा बाजारातील वाटा 46 टक्क्यांवर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जून महिन्यातील युपीआय व्यवहारांचे आकडे सादर करण्यात आले असून यामध्ये ‘फोनपे’ ने 46.04 टक्क्यांचा बाजारातील वाटा काबीज करत पहिले स्थान काबीज केले आहे. कंपनीच्या युपीआय व्यवहारांमध्ये मेच्या तुलनेत जूनमध्ये 0.77 टक्क्यांची वाढ झाली आहे. सदरच्या स्पर्धेत गुगल पे, पेटीएम, ऍमेझॉन पे यासारखे ऑनलाईन युपीआय प्लॅटफॉर्म फोनपेच्या मागे राहिले आहेत. यादीत दुसऱया स्थानी गुगल पे आणि तिसऱया स्थानी पेटीएम असल्याची माहिती नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी दिली आहे.
फोनपे वर व्यवहार तेजीत
फोनपेवर जूनमध्ये ऍपच्या माध्यमातून 129.27 कोटी युपीआय व्यवहार करण्यात आले आहेत. या तुलनेत मेमध्ये 114.98 कोटी व्यवहार झाले आहेत. म्हणजेच महिन्याच्या आधारे पाहिल्यास युपीआय व्यवहारांची संख्या 14.28 कोटीने वाढली आहे.
गुगल पेचा वाटा घटला गुगल पे वर जूनमध्ये 88.05 कोटीचे युपीआय व्यवहार झाले आहेत. मे महिन्यात हा आकडा 97.22 कोटीवर राहिला होता. यादरम्यान जूनमध्ये कंपनीचा बाजारातील वाटा 0.04 टक्क्यांनी घटला आहे. गुगल पेचा बाजारातील जूनमधला वाटा 34 टक्के इतका होता. ऍमेझॉन पेला व्यवहारात जवळपास 7 टक्क्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.









