प्रतिनिधी /फोंडा
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तारखा नुकत्याच केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आल्या. त्याचदिवसापासून निवडणूकीच्या धर्तीवर आचारसंहिता लागू केल्यानंतर ताबडतोब रस्त्याशेजारी सर्वत्र विविध पक्षातर्फे अवाढव्य होर्डीग, चौकाचौकात बॅनर्स हटविण्याची मोहीम नुकतीच भरारी पथकाकडून हाती घेण्यात आली.
फोंडा शहर परिसरातील विविध नाक्यावर बसविण्यात आलेले अवाढव्य बॅनर्स आचारसंहिता लागून केल्यानंतर कंत्राटदार असलेल्या एका ऍडव्हर्टाजिंग एजन्सीतर्फे काढण्यात आले होते. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पताका व इतर फ्लेक्स बॅनर्स हटविण्याचे काम भरारी पथकाने हाती घेतले आहे. त्यामुळे फोंडय़ातील रस्ते मोकळे दिसू लागले आहेत. तसेच जुने बसस्थानक येथे उभारण्यात आलेल्या डिजीटल बॅनरवरही राजकीय पक्षाच्या जाहीरतीवर मर्यादा येणार आहे.









