स्थानक एक बोलेरो जीपसह अवाढव्य कार्यक्षेत्र हाताळते : आऊटपोस्ट व शहर पेट्रोलींगसाठी केवळ तीन बोलेरो
प्रतिनिधी / फोंडा
गोवा राज्य सरकारतर्फे पोलीस खात्याला नुकतीच 14 महिद्रा र्स्कोरपिओ वाहने विविध पोलीस स्थानकात सेवेसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. मात्र अंत्यत गरज असलेल्या फोंडा पोलीस स्थानकाच्या नशिबी एकही वाहन लाभलेले नाही. फोंडय़ातील पोलिसांना स्थानकावर असलेल्या केवळ एका महिंद्रा बोलेरो जीपवर अवलंबून राहून कोरोनाकाळात पंटलाईनवर काम करावे लागत आहे.
फोंडा पोलीस स्थानक हे अवाढव्य कार्यक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. माशेलहून पंचवाडीपर्यत, उसगांव-गांजे ते धारबांदोडा, निरंकाल ते शिरोडापर्यंत विस्तारलेले पोलीस स्थानकाची हद्द आहे. पेट्रोलींगसाठी केवळ तीन राबोट वाहनाद्वारे शहर व आऊटपोस्टवर सेवा बजवावी लागत आहे. एखाद्यावेळी अनैसर्गिक मृत्य़ुची घटना घडल्यास वाहन येईपर्यत उपनिरीक्षकांना घटनास्थळावर पोचण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. फोंडा पोलीस स्थानकात सद्या एकूण तीन रोबोट व एक् महिंद्रा बोलेरो वाहने कार्यरत आहेत. मोडकळीस आल्यानंतर खात्य़ाच्या सुपुर्द केलेल्या दोन रोबोट वाहन्याच्या बदलीत एकही वाहन पुरविलेले नाही. सद्यपरिस्थितीन कार्यरत असलेल्या रोबोट जीपगाडय़ाही रामबरोसे चालत आहेत.
वाहनअभावी ताटकळत राहण्याची वेळ
फोंडा पोलीस स्थानक राज्यभरात अनैसर्गिक मृत्यूची नोंदीत अग्रस्थानी असते यावेळी वाहनअभावी उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकांसाठी राखीव असलेले वाहन घेऊन घटनास्थळी पंचनाम्यासाठी जावे लागते. कुंडई, मडकई, उसगांव व बेतोडा औद्यागिक वासहती असल्यामुळे फोंडय़ात बिगरगोमंतकीयांचा भरणा जास्त आहे. यंदाच्या ‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या जबर फटका फोंडा तालुक्याला बसला होते. यावेळी सेवा देतान वाहनाअभावी फोंडा पोलिसांवर कठिण परिस्थिती ओढावलेली होती. मागील लॉकडाऊनच्या काळात तात्पुरत्या आरटीओच्या वाहनांची सोय पोलीस स्थानकांसाठी करण्यात आल्या होत्या. यंदा केवळ पोलीसांना आपल्या मोडकळीस आलेल्या वाहनातून कार्यभार हाताळावा लागत आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रंटलाईनवर काम करताना आहे त्या साधनसुविधेमध्ये काम चालविणे अशी परिस्थिती फोंडा पोलिसांवर आलेली आहे.









