तरवळे, वाजे, शिरोडा भागात वृक्ष कोसळले; वीज पुरवठा ठप्प
प्रतिनिधी /फोंडा
एप्रिल महिन्यातील रविवारी रामनवमीदिवशी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱयामुळे फोंडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. बोरी, बेतोडा, तरवळे, वाजे, शिरोडा, फेंडा व इतर भागांना या वादळाचा तडाखा बसला. त्यात अनेक घरांवर वृक्ष कोसळल्याने लाखो रुपयांची हानी झाली. फोंडा अग्निशामक दलात 15 ठिकाणी पडझडीच्या तक्रारी नोंद करण्यात आल्या. बऱयाचठिकाणी वीजखांब कोलमडून पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला.अग्नीशामक दल व वीज खात्याचे कर्मचारी सोमवारी दिवसभर मतदातकार्यात गुंतले होते.
तरवळे, काराय, वाजे येथे फणस, आंब्याचे झाड कोसळल्याने छप्पर व इतर सामानाची बरीच मोडतोड झाली. वाजे बोरी येथे गुरांच्या गोठय़ावर आंब्याचे झाड कोसळल्याने नुकसानी झाली. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे वीज वाहिनीवर कोसळल्य़ाने वीजपुरवठा खंडित झाला. खंडित झालेला वीज पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु होते. वीज प्रवाह खंडित झाल्याने रात्रीच्या अंधारात फोंडा अग्निशामक दल व इतर यंत्रणाना मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. कुंडई व फोंडा अग्निशामक दलातर्फे सोमवारी दिवसभर मदतकार्य सुरु होते.
तरवळे,बोरी-शिरोडा भागात घरांवर वृक्ष कोसळले
बोरी व शिरोडा पंचायत क्षेत्रालाही या वादळाचा तडाखा बसला. तरवळे मैदान, गोविंदनाथ मंदिर तिशे येथे आंब्याचे झाड कोळल्याने सुमारे 10 हाजाराचे नुकसानी झाली तर सुमारे 50 हजारांची मालमत्ता वाचविण्यात अगिनशामक दलाने यश मिळवले. एमपीएल कंपनीजवळ, जॉली कॉर्नर, भूमिपुरूष मंदिर तरवळे, जुने गिरण परिसर,काराय इस्पितळ येथे, चर्च रोड काराय येथे माड कोसळून वीजवाहिन्यावर कोसळल्य़ाने वीज पुरवठा खंडित झाला. फोंडा अग्नीशामक दलाची पथके मदतकार्यांत गुंतली होती. संतोष गावकर, देवीदास बायेकर, अवधूत नाईक, चंद्रशेखर मडकईकर, गणेश सांगोडकर, जितेंद्र भांडारी, योगेश वेलिंगकर, वामन गावडे, बाबी गावडे, बाबी पिळर्णकर, सदानंद कवळेकर यांनी सहकार्य केले. रविवारी उशिरा रात्री झालेल्या वादळामुळे फोंडय़ातील बऱयाच भागात मोठी नुकसानी झाली.









