ऑनलाईन टीम / सॅन फ्रान्सिस्को :
ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट शनिवारी हॅक झाले. ट्विटरने स्वतः विधान जारी करत याबाबत माहिती दिली. यामध्ये थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून फेसबुकचे अधिकृत अकाउंटला निशाणा बनवण्यात आल्याचे सांगितले. या हॅकिंगमागे ‘अवरमाइन ग्रुप’ नावाची सायबर गुन्हेगारी संघटनाचा हात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, हॅकर्सनी इन्स्टाग्रामवर देखील अशाचप्रकारे फेसबुकचे अकाउंट हॅक केले आणि त्यावर ग्रुपचा फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही अवरमाइन ग्रुपचे आहोत. फेसबुक सुद्धा हॅक केले जाऊ शकते. मात्र त्यांची सिक्मयोरिटी ट्विटरपेक्षा चांगली आहे.
या संघटनेने यापूर्वीही गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग आणि ट्विटरचे प्रमुख जॅक डोर्सी यांचे अकाउंट केले आहेत.









