नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्र सरकारनं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग कंपन्यांना नियमावलींचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले होते. यासाठी तीन महिन्यांची ताकिद देण्यात आली होती. आज ही मुदत संपत असल्याने फेसबुकने याबाबत कंपनीचं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
आम्ही आयटी नियमांचं पालन करणार यात दुमत नाही. काही मुद्द्यांवर चर्चा करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सरकारसमोर आमचं म्हणणं मांडणार आहोत, असं फेसबुक प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मात्र फेसबुक हे व्यासपीठ लोकांना स्वतंत्रपणे आणि सुरक्षितरित्या व्यक्त होण्यासाठी कटीबद्ध असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
25 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारनं सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी नियमावली जाहीर केली. AAत्यानुसार या कंपन्यांना भारतात एका तक्रार निवारण अधिकाऱ्याची आणि एका विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक बंधनकारक आहे.









