प्रतिनिधी / बेळगाव
फेसबुक प्रेंड्स सर्कलने मुक्मया प्राण्यांची काळजी घेणाऱया विविध संस्थांना जीवनावश्यक साहित्य दिले आहे. सर्कलने 25 किलो जीरा तांदूळ फोनिक्स फौंडेशनला, 25 किलो तांदूळ बावा या संस्थेला, 25 किलो तांदूळ बार्क या संस्थेला दिले. तर 25 किलो तांदूळ गरिबांना भोजन देण्यासाठी युवासेनेकडे सुपूर्द केले. व्हेगा हेल्मेट्सच्या मदतीने शहापूर मुक्तीधामला 8 फेसशिल्ड्स दिले. शिवाय दुसऱया रेल्वेगेट परिसरात सर्कलच्या सदस्यांनी सॅनिटायझेशन केले. फेसबुक प्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, आनंद तोटगी, डॉ. देवदत्त देसाई, डॉ. समीर शेख, सम्राट पाटील, व्हेगा हेल्मेटचे व्यवस्थापक विशाल गीते यांनी हा उपक्रम राबविला.









