प्रतिनिधी / वाई
वाई येथील एका पस्तिस वर्षीय महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून तीचे अश्लील छायाचित्र घेऊन फोटो समाज माध्यमांवर प्रसारीत केल्या प्रकरणी सागर तुकाराम सोनवलकर (रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) याला वाई पोलीसांनी अटक केली आहे.
संबंधित पिडीत महिला वाई येथे आपल्या कुटूंबियांसह राहते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यांनी फेसबुकवर आपले अकौंटवर सागर सोनवलकर याच्याशी त्यांची मैत्री झाली. त्यातून दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. त्यातुंन त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
तुम्ही मला खूप आवडता मी तुम्हाला सुखात ठेवेन असे सांगितले. त्यानंतर सोनवलकर यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगून त्याचे फोटो काढले. त्यानंतर अश्लील फोटोची मागणी केली. त्याच्याकडून वारंवार मागणी वाढू लागल्याने महिलेने त्याचा क्रमांक ब्लॉक केला. त्याचा राग मनात धरून सोनवलकर याने महिलेच्या अकौंटवरील अश्लील छायाचित्र पिडीतेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर व समाज माध्यमामावर प्रसारीत करून व त्यांची बदनामी केली. संबंधित महिलेची बदनामी करत तसेच मुलींचे लग्न होऊन देणार नाही अशी धमकी दिली.
संबंधित पिडीतेने या प्रकरणी सोनवलकर याच्या त्रासाला कंटाळून वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करीत आहेत. पोलिसांनी विनय भंग व माहिती तंत्रज्ञान कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.