नवी दिल्ली
सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणाऱया फेसबुक इंडियाचा महसूल मागील आर्थिक वर्षात 2019-20 च्या दरम्यान जवळपास 43 टक्क्यांनी वृद्धी घेत 1277.3 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे. सदर कामगिरीसोबत कंपनीची नफा कमाई दुप्पटीपेक्षा अधिक होत 135.7 कोटींवर पोहोचली असल्याचे कंपनीने नोंदवले आहे. यासह मागील आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न 893.4 कोटी रुपये झाले होते.
फेसबुक इंडियाला निव्वळ लाभ हा आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीत तब्बल 107 टक्क्यांनी वधारुन 135.7 कोटी रुपयांवर राहिला आहे. यासोबत मागील वर्षात कंपनीला 65.3 कोटी रुपयांचा नफा झाला होता, असे स्पष्टीकरण फेसबुकच्या प्रवक्त्याने दिले आहे. तसेच भारताची बाजारपेठ ही फेसबुकसाठी महत्वपूर्ण राहणार असून येत्या काळातही कंपनी सर्व ताकदीनिशी अशीच कामगिरी करणार असून विस्तारावरही लक्ष केंद्रीत करणार आहे.









