दापोली / प्रतिनिधी
दापोली तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वारंवार ऑनलाईन व्यवहार करताना लाखोंची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलीस स्थानकात दाखल आहेत. त्याचा तपास सुरू असतानाच काल पुन्हा अकरा लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.
परदेशातील महिलेजवळ फेसबुक मैत्रीचे रूपांतर व्हॉट्सअॅप मैत्रीत झाले. विश्वास संपादित केल्यावर त्या महिलेने व तिच्या आणखी एका साथीदाराने अमेरिकन डाॅलर्सचे भारतीय चलनात रूपांतर करून देण्याचे अमीष दाखवत दापोली तालुक्यात रहाणा-या एका शासकीय कर्मचा-याला अकरा लाखाचा गंडा घातला आहे.पोलीसांकडून वारंवार जनजागृती होत आहे आणि आता तर जनजागृती करिता दापोली पोलीस स्थानकात कायद्याचं म्युझियमच उभं आहे. तेथेही वरील फोटोतून या बाबत जनजागरण करण्यात येते आहे. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना जास्तीत जास्त सावधानता बाळगण्याचे आवाहन या गुन्ह्याचा तपास करणा-या पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यानी केले आहे.