वॉशिंग्टन –
आजच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक असून यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये स्मार्टवॉचच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याचा फायदा उठवण्यासाठी आता फेसबुकनेही तयारी केली असल्याचे समजते. फेसबुक नवे स्मार्टवॉच लाँच करणार आहे. आपले नवे पहिलेवहिले स्मार्टवॉच फेसबुक कंपनी लवकरच बाजारात सादर करणार आहे. या नव्या स्मार्टवॉचमध्ये डय़ुअल कॅमेरा आणि हार्ट रेट मॉनिटरची सुविधा असणार आहे. मनगटावर कॅमेरा असल्याने त्यावर आपले फोटो घेऊन ते फेसबुकवर शेअर करता येण्याची सोय या स्मार्टवॉचमध्ये असेल.









