फेसबुकसह व्हॉट्सऍपची सेवा प्रभावीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारी जगभरात काही तास फेसबुकच्या सर्व सेवा डाऊन राहिल्या होत्या. यामध्ये फेसबुक सेवेसह इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप, अमेरिकन दूरसंचार कंपन्या यासारख्या Verizon, At&t व T Mobile यांच्या सेवा काही तास खंडित झाल्या होत्या. परंतु या सर्व प्रवासात फेसबुक डाऊन राहिल्याने फेसबुकचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांना व्यक्तिगत मोठे नुकसान झाले आहे.
झुकरबर्ग यांच्या नेटवर्थमध्ये काही तासांत 7 अब्ज डॉलर(52,212 कोटी रुपये) इतकी घसरण झाली आहे. तसेच अब्जाधीशांच्या यादीत एका नंबरने घसरण झाली आहे.
बिलिनेअर इंडेक्समध्ये 5 व्या स्थानी
ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार फेसबुक डाऊनमुळे झुकरबर्ग यांची संपत्ती घटून 122 अब्ज डॉलरवर राहिली आहे. तर दुसरीकडे बिलगेट्स यांच्याही खाली म्हणजे पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. या अगोदर ते धनाढय़ाच्या यादीत चौथ्या स्थानी राहिले होते. चालू वर्षातील सप्टेंबरपासून आतापर्यंत त्यांची एकूण संपत्ती 19 अब्ज डॉलरने घसरली आहे.
फेसबुकचे समभाग प्रभावीत
या दरम्यान अमेरिकन शेअर बाजारात फेसबुकच्या समभागात विक्री सुरु झाली होती. एका दिवसात समभागात 5 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे.









