चेहर्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिला फेशियल करून घेतात. फेशियलमुळे चेहर्यावरचे डाग लपतात. त्वचेतली घाण, धूळ निघून जाते. मात्र सतत फेशियल करत राहिल्यामुळे त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. फेशियलच्या दुष्परिणामांविषयी…
- फेशियलच्या विविध टप्प्यांमध्ये चेहर्यावर विविध प्रकारची क्रीम्स आणि इतर सौंदर्यप्रसाधनं लावली जातात. पण ही उत्पादनं प्रत्येकीच्या त्वचेवर परिणामकारक ठरतीलच असं नाही. काही रसायनांमुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतं. खाज सुटू शकते. त्यामुळे साधारण महिन्याभराच्या अंतराने फेशियल करावं.
- फेशियलदरम्यान त्वचेवर स्क्रब केलं जातं. विविध उत्पादनांनी मसाज केला जातो. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फेशियल केल्यास स्क्रबिंगमुळे त्रास होऊ शकतो. त्वचा लालसर दिसू शकते. शिवाय त्वचेची रोमछिद्रंही बंद होतात. तसंच त्वचेशी संबंधित तक्रारीही निर्माण होऊ शकतात.
- सारखं
स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेचा पीएच बॅलन्स बिघडतो आणि त्वचेतला नैसर्गिक ओलावा कमी
होतो. यामुळे
फेशियलचे लाभ मिळत नाहीच शिवाय त्वचेचं नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. - फेशियलदरम्यान स्क्रबिंग आणि मसाज चुकीच्या पद्धतीने केल्यास त्वचेवर पुरळ येऊ शकतं.
त्यामुळे तज्ञांकडूनच फेशियल करून घ्यावं.