खाण व पुनर्निमाण क्षेत्रातील तेजीने फेब्रुवारीत सकारात्मक कामगिरी
नवी दिल्ली :
देशाच्या आर्थिक उत्पादनामध्ये चालू वर्षाच्या फेब्रुवारीत 4.5 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. जी मागील वर्षातील सात महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक राहिल्याची नोंद केली आहे. मुख्य स्वरुपात खाण आणि पुनर्निमाणासोबत वीज उत्पादनात वृद्धी झाली असून याचा सकारात्मक लाभ म्हणून औद्योगिक उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (आयआयपी) यांच्या आधारे माहिती घेतल्यास मागील वर्षातील फेब्रुवारीत आयआयपीमध्ये केवळ 0.2 टक्के वृद्धी झाल्याची नोंद झाली आहे.
या अगोदर जुलै 2019 मध्ये आयआयपीमध्ये 4.9 टक्क्मयांनी वाढ झाली होती. औद्योगिक उत्पादनात मागील वर्षातील ऑगस्टमध्ये 1.4 टक्क्मयांवर, सप्टेंबरमध्ये 4.6 टक्के आणि ऑक्टोबर महिन्यात यात मात्र 6.6 टक्क्मयांनी घसरण झाली होती. त्यानंतर मात्र नोंव्हेबर महिन्यात 2.1 टक्क्मयांवर , डिसेंबरला 0.1 टक्के आणि जानेवारी 2020 रोजी 2.1 टक्क्मयांची वृद्धी नोंदवण्यात आली होती.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवाडीनुसार पुनर्निमाण उत्पादनात चालू वर्षातील फेब्रुवारीत 3.2 टक्क्मयांनी वाढले आहे. एक वर्षापूर्वी याच महिन्यात हा हा टक्का 0.3 टक्क्मयांनी घसरला होता. सध्या वीज उत्पादनात 8.1 टक्क्मयांनी वाढ झाली तर फेब्रुवारी 2019 रोजी यातच 1.3 टक्क्मयांची वाढ नोंदवली होती.
खाण क्षेत्रातील उत्पादन
चालू वर्षातील फेब्रुवारीत खाण क्षेत्रातील उत्पादन 10 टक्क्मयांनी वधारले आहे. हेच मागील वर्षात याच महिन्यात 2.2 टक्क्मयांनी वधारले होते. मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारीच्या दरम्यान मात्र आयआयपीचा वृद्धीदर घटून 0.9 टक्क्मयांवर राहिला आहे. या अगोदरच्या वर्षात 2018-19 मध्ये ही वाढ 4 टक्क्मयांनी झाली होती. भांडवली वस्तूंचे उत्पादनात चालू फेब्रुवारीत 9,7 टक्क्मयांनी घटले आहे. मागील वर्षातील याच महिन्यात 9.3 टक्क्मयांनी घसरण नोंदवली आहे.









