वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 च्या वर्षात जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची विक्री लक्षणीय राहिली आहे. याचाच अर्थ इलेक्ट्रिक कार्सप्रती खरेदीदारांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे, हे स्पष्ट आहे. देशात मागच्या दोन महिन्यात 1 लाखाहून अधिक इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली आहे. यात बाजी मारली आहे ती अर्थातच ‘टाटा मोटर्स’ने.
इलेक्ट्रिक वाहनांना भारतात उतरवण्यासाठी आता टाटा व्यतिरिक्त इतर कंपन्यांनीही कंबर कसली आहे. अनेकविध कंपन्या ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेत या गटात आपल्या कार्स सादर करण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात टाटाने इलेक्ट्रिक वाहन गटात नेक्सॉनला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे म्हटले आहे. फेब्रुवारीत 2264 नेक्सॉन/टिगोर कार्सची विक्री करत टाटा मोटर्स आघाडीवर राहिली आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्समध्ये 96 टक्के इतका मजबूत वाटा ‘टाटा’ने उचलला आहे. नेक्सॉन व टिगोर यांच्या विक्रीने वेगळी उंची मागच्या महिन्यात गाठली आहे. 2264 कार्सची विक्री करत मागच्या वर्षाच्या याच महिन्यातील विक्रीची तुलना करता 421 टक्के विक्री अधिक राहिली आहे.
टाटा नेक्सॉनची किंमत 14.29 ते 16.90 लाख रुपये (एक्स शोरुम) व टाटा टिगोरची किंमत 11.99 ते 13.14 लाख रुपयेपर्यंत इतकी आहे.
फेब्रुवारीतील कार्सची विक्री
कंपनी मॉडेल फेब्रुवारी 22 फेब्रुवारी 21
टाटा नेक्सॉन/टिगोर 2264 434
एमजी झेडएस इव्ही 38 127
महिंद्रा ई व्हेरिटो 12 10
हय़ुंडाई कोना 7 17
बावायडी ई6 10 0
टाटा नेक्सॉन- 312 कि. मी. मायलेज
टाटा टिगोर- 181 किमी मायलेज









