वृत्तसंस्था/ पॅरीस
स्वीसचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडरर याला गेल्या काही दिवसापासून गुडघा दुखपतीची समस्या सातत्याने जाणवत असल्याने त्याला अनेक महत्त्वाच्या स्पर्धामध्ये सहभागी होता आले नाही. 40 वर्षीय रॉजर फेडररने आपल्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉजर फेडररने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. 2021 च्या टेनिस हंगामात फेडररने केवळ 13 सामने खेळले होते. 2020 साली फेडररच्या गुडघ्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण तो गुडघा दुखापतीतून पूर्ण बरा होऊ शकला नाही. आता येत्या लवकरच पुन्हा त्या दुखापतीवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती फेडररने दिली आहे.









