परिवर्तन लाट 2.0 कुटुंब राज संपवण्यासाठी अत्यावश्यक: सिद्धेश भगत
ऑनलाईन टीम / गोवा
आम आदमी पार्टी युथ विंगचे अखिल भारतीय उपाध्यक्ष आणि गोवा राज्य समन्वयक सिद्धेश भगत यांनी शुक्रवारी फॅमेली -राज प्रोत्साहन देणाऱ्या भाजप पक्षाचा निषेध केला, परिवर्तन लाट 2.0 कुटुंब राज संपवण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे अस ते पुढे म्हणाले.
“2012 मध्ये भाजप सरकारने कुटुंब राज संपवण्यासाठी परिवर्तन लाट 1.0 आणली. त्यांनी गोवेकरांना ते दूर करण्याचा आग्रह केला आणि लोकांनीही तेच पाळले. एका दशकानंतर हाच पक्ष आता एका कुटुंबाला दोन तिकिटे देऊन फेमिली राजला प्रोत्साहन देत आहे अस प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले”गेल्या वर्षी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फेमिली राज संपवण्याचे वचन दिले होते आणि आज तेच सरकार राणे आणि मोन्सेराते कुटुंबांना तिकीट देत आहे. मला आश्चर्य वाटते की भाजप सरकारला “फॅमेली राज” या शब्दाचा अर्थ काय आहे ते माहित आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारचा अर्थ आता मला कळला आहे, अस सांगून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. डबल-इंजिन म्हणजे जोडप्यांना तिकीट देणे, त्यामुळे दुहेरी भ्रष्टाचार होईल. अशी टीका त्यांनी केली “भाजपने ज्या पद्धतीने राणे आणि मोन्सेराते जोडप्यांना पक्षाच्या तिकीटांचे वाटप केले, ते औपचारिक निवडणुकीचे तिकीट नसून जोडप्यांसाठीच्या व्हॅलेंटाईन डे पार्टीच्या तिकीटासारखे दिसते असा टोमणा त्यांनी हाणला “चाळीस पैकी चौदा मतदारसंघ आता कुटुंबातील सदस्यांना दिले जात आहेत, जे एकूण 35 टक्के आहेत. शिवाय, कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या विश्वासार्हतेच्या आधारे तिकीट दिले जात आहे. “अस आप युवा विंगचे अध्यक्ष पूजन मालवणकर म्हणाले, “परा येथे राहणारी पण शिवोली ची उमेदवारी कार्यालयात बसून कशी लढवता येते याचे डीलायला लोबो हे एक उत्तम उदाहरण आहे असं ते पुढे म्हणाले