प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील फुरुस येथील जागृत देवस्थान भुलेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने यात्रास्थळ अंतर्गत १० लाखाचा निधी मंजूर झाला असून लवकरच मंदिर व परिसराचे रूपडे पालटणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने येथील मंदिर व परिसराचा विकास व्हावा, याकरिता माजी सभापती सुषमा रांगडे, माजी सरपंच लक्ष्मण नवरत, सचिन पाटील व ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे निधीसाठी साकडे घातले होते. जि.प. सदस्य अरूण कदम यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून १० लाखाचा निधी मंजूर करून घेतला.
आमदार योगेश कदम यांनी फुलस गटात गावभेटी दरम्यान फुरुस, सुकदर, सुसेरी व पोयनार येथील गावांना भेटी देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान, फुरूस ग्रामस्थांनी भुलेश्वर मंदिर सुशोभिकरणाचा प्रश्न उपस्थित केला असता १० लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. याप्रसंगी जि.प. सदस्य अरूण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, पंचायत समिती सभापती विजय कदम, विभागप्रमुख संदीप कांबळे, गणेश मोरे, सुषमा रांगडे, वजुद्दीन मारूफ, दर्शन महाजन, करण चव्हाण, किरण दुफळे आदी उपस्थित होते.









