नवी दिल्ली : रियल काश्मीर एफसी फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्कॉटलंडचे डेव्हिड रॉबर्टसन व त्यांचे कुटुंबीय स्कॉटलंडला प्रयाण करण्याची वाट पाहात आहेत. भारतीय उच्चायुक्ताने ब्रिटीश उच्चायुक्ताशी संपर्क साधला आहे. प्रशिक्षक डेव्हिड रॉबर्टसन यांचे वास्तव्य सध्या श्रीनगरमध्ये आहे. रॉबर्टसन आणि त्यांच्या कुटुंबियाला लवकरच मायदेशी जाण्याची रितसर परवानगी दिली जाईल, असे सांगण्यात आले.
रियल काश्मीर एफसी संघाचे स्कॉटलंडचे प्रमुख प्रशिक्षक डेव्हिड रॉबर्टसन यांना दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्ताने आणखी तीन दिवस थांबण्यास सांगितले आहे, अशी माहिती या फुटबॉल क्लबचे सहफ्रांच्यायजी संदीप चेटु यांनी गुरूवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
डेव्हिड रॉबर्टसन यांच्यासाठी अमृतसरमधून हवाई प्रवासाकरिता परवाना मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान डेव्हिड रॉबर्टसन आणि त्यांच्या कुटुंबियाना प्रयाणासाठी सज्ज राहण्यास ब्रिटीश उच्चायुक्तातर्फे बुधवारी सांगण्यात आले आहे. एआयएफएफने आय लीग फुटबॉल स्पर्धा लवकरच गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.









