वृत्तसंस्था/ लंडन
लक्झम्बर्गचा फुटबॉलपटू डॅनेल सिनानीबरोबर नॉर्विच संघाने नवा करार केला आहे. सिनानी आणि नॉर्विच यांच्यात नवा करार तीन वर्षांसाठी झाला आहे. यापूर्वी त्याने प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत लक्झम्बर्ग क्लबकडून खेळताना 16 सामन्यांत 14 गोल नोंदविले होते.
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी नॉर्विचचा संघ झगडत आहे. 20-21 च्या फुटबॉल हंगामासाठी सिनानीने एफ-91 डय़ुडेलेंगी क्लबबरोबर करार केला होता.









