शांघाय
मँचेस्टर युनायटेड क्लबचा माजी फुटबॉलपटू मेरोनी फेलानी यांची मंगळवारी रूग्णालयातून सुटका करण्यात आली. चीनमधील सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू फेलानी सहभागी झाला होता. 22 मार्च रोजी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. चीनच्या रूग्णालयात सुमारे तीन आठवडे फेलानीवर वैद्यकीय इलाज चालू होता. फेलानी कोरोनामुक्त झाल्याने त्याला रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली.