वृत्तसंस्था/ लंडन
वेल्स फुटबॉल क्लबचा कर्णधार तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू गॅरेथ बेलने आंतरराष्ट्रीय तसेच क्लबस्तरीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 33 वर्षीय गॅरेथ बेलने ब्रिटीश फुटबॉलच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.
गॅरेथ बेलने यापूर्वी लॉस एंजिल्स एफसी क्लबबरोबर यापूर्वी करार केला होता. हा करार चालू उन्हाळी मोसमात संपणार आहे. हा करार संपल्यानंतर आपण फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याचे बेलने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. वेल्स फुटबॉल क्लबतर्फे 111 सामन्यात बेलने प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच दोनवेळा युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत बेलने इंग्लंड फुटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. वेल्सच्या बेलने इंग्लिश प्रिमियर फुटबॉल लिग स्पर्धेत टॉटनहॅम क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते. 2013 साली तो रियल माद्रिद फुटबॉल क्लबकडून खेळत होता.









