बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मागीलवर्षी ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षात ३० टक्के शुल्क कमी करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी विनाअनुदानित शाळांचे २,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान कर्नाटकमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संबंधित व्यवस्थापनाने हे सर्वेक्षण केले.
मागील वर्षी गोळा झालेल्या शिक्षण शुल्कातून ३० टक्के फी कमी करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे होणार्या आर्थिक नुकसानीबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालात नमूद केल्याप्रमाणे, सर्व शाळा कोरोना असलेने लॉकडाऊन केल्यामुळे बंद ठेवण्यात आल्या होत्या. विना अनुदानित शाळा पालकांनी शैक्षणिक शुल्क जमा न केल्यामुळे आर्थिक संकटात सापडल्या आहेत. या शाळांना शासनाचे शून्य पाठबळ असल्याने आणि आता फी कमी केल्याने ही समस्या आणखी वाढली आहे.
सर्व्हेक्षणात, शाळा व्यवस्थापनाने फी कमी करण्याच्या आदेशामुळे प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आणि शाळा व्यवस्थापन कर्ज थकबाकीदार असल्याचे नमूद केले.