प्रतिनिधी/कोल्हापूर
कला महार्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीच्या वतीने शनिवार 23 जुलै रोजी सायंकाळी 5ë 30 वाजता येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये फोर्स माजेर हा पेंच भाषेतील चित्रपट दाखविला जाणार आहे. या चित्रपटाला 41 नॉमिनेशन आणि 31 पुरस्कार लाभले आहेत. डार्क कॉमेडी प्रकारात या चित्रपटाची गणना चित्रपट तज्ञ करतात. चित्रपटरसिकांनी या चित्रपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी केले आहे.









