वृत्तसंस्था / केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू व्हरनॉन फिलँडर याचा लहान भाऊ टिरोनी फिलँडर याची बुधवारी केपटाऊनमधील एका मार्गावर अज्ञात व्यक्तीकडून गोळय़ा घालून हत्या करण्यात आली.
फिलँडरच्या निवासस्थानापासून काही मीटर अंतरावर ही दुर्घटना घडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांनी दिली. या संदर्भात केपटाऊनचे पोलीस मारेकऱयाचा शोध घेत आहेत. सदर घटना बुधवारी दुपारच्यावेळी घडली. या खुनाच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला अटक झालेली नाही. 35 वर्षीय व्हेरनॉन फिलँडरने गेल्यावर्षीच्या प्रारंभीच आपल्या क्रिकेट कारकीर्दीला निरोप दिला होता. आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत फिलँडरने 64 कसोटी आणि 101 वनडे व टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे.









