ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
7 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात आरोग्य दिन साजरा केला जातो. आजच्या या खास दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशावर ओढवलेल्या संकटाच्या काळात कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत त्याच बरोबर एक खास व्हिडिओ देखील ट्विटर वर शेअर केला आहे.
मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज जागतिक आरोग्य दिनी आपण एकमेकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करुच, त्याबरोबरच कोरोना विरुद्धच्या लढाईत नेतृत्व करणारे सर्व डॉक्टर्स, नर्स आणि सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांचे आभार व्यक्त करू. असे म्हटले आहे. तसेच यावेळी मोदी यांनी सर्व जनतेला सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.
तसेच मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओला त्यांनी ‘फिर मुस्कुएगा इंडिया… फिर जीत जाएगा इंडिया’ अशी टॅगलाईन दिली आहे. या व्हिडिओमध्ये बॉलीवूड मधील कलाकार, क्रिकेटर्स असून यामध्ये त्यांनी लोकांना कोरोना चा सामना एकजूट होऊन करण्याचे आणि घरातच रहाण्याचे आवाहन केले आहे.









