वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलीकडेच भारतीय फुटबॉल संघाने तिरंगी फुटबॉल स्पर्धा जिंकल्याने त्यांचे फिफाच्या मानांकनातील पाच अंकांनी वधारले आहे. फिफाच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत भारतीय फुटबॉल संघ 101 व्या स्थानावर आहे.
फिफाच्या यापूर्वीच्या मानांकन यादीत भारत 106 व्या स्थानावर होता. दरम्यान इंफाळमध्ये अलीकडेच झालेल्या तिरंगी फुटबॉल स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते. या तिरंगी स्पर्धेत किर्जिस्तान आणि मॅनमार यांचा सहभाग होत्या. नजीकच्या भविष्य काळात भारतीय फुटबॉल संघ पहिल्या 100 देशामध्ये स्थान मिळवण्याचे काम ध्येय ठेवेल असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी म्हटले आहे.









