मुंबई
फिनो पेमेंट बँक लवकरच आपला आयपीओ भारतीय भांडवली बाजारात सादर करणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओतून कंपनी 1200 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरचा आयपीओ हा 29 ऑक्टोबरला बाजारात खुला होणार असून 2 नोव्हेंबरला बंद होणार आहे. आयपीओसाठी 560-577 रुपये प्रति समभाग भाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. कंपनीच्या प्रवर्तकांकडून 1 कोटी 56 लाखहून अधिक इक्विटी समभाग विक्रीकरीता सादर केले जाणार आहेत.









