आतापर्यंत २५० जणांची तपासणी
औंध / प्रतिनिधी
लॉकडाऊन मध्ये शिथीलता दिल्याने औंध परीसरातील परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी ओढ लागली असून तपासणीसाठी गेली दोन दिवस औंध ग्रामीण रुग्णालयात रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दवाखाना प्रशासनाचा ताण वाढला आहे.
आपल्या गावी जाण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने औंध परिसरातील परप्रांतीय गेले दोन दिवसांपासुन औंधच्या ग्रामीण रुग्णालयात नंबर लावून आहेत. आतापर्यंत २५०जणांची तपासणी करण्यात आली आहे. परप्रांतीय बांधवाना घरी जाण्याची ओढ असल्याने दवाखान्यात गर्दी होऊ लागली आहे. सुरक्षा रक्षक त्यांना सोशल डिस्टनिंगने उभे करत आहेत. योग्य काळजी घेऊन दवाखाना प्रशासन त्यांची तपासणी करत आहेत.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी जाण्याची आस दिसत असल्याचे पहावयास मिळाले.
तपासणीत कुणालाही संशयास्पद लक्षणे नाहीत
औंध ग्रामीण रुग्णालयात परप्रांतीय लोकांची तपासणी करण्यात येत आहे,आतापर्यंत केलेल्या तपासणीत कोणालाही संशयास्पद लक्षणे आढळून आली नाहीत,घरी जाण्याच्या ओढीने परिसरातील सर्व परप्रांतीयांनी तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.शासनाने त्यांची लवकरात लवकर व्यवस्था करावी. -डॉ-पुष्कराज देशमुख वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय औंध








