डिसेंबरपर्यंत वाढीसह 2,304 कोटी रुपयांवर
नवी दिल्ली : महामार्गावर कर गोळा करण्यासाठी आता विविध टोल नाक्यावर नवीन यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामध्ये सध्या संपूर्ण देशामध्ये फास्टॅगची सुविधा सुरु केली असून याच्या मदतीने रस्ते कर संकलन केले जाते. विशेष बाब म्हणजे डिसेंबर 2020 मध्ये कर संकलन वधारुन 2,303.79 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्याच्या तुलनेत कर संकलन 201 कोटी रुपयापेक्षा अधिक आहे.
फास्टॅगच्या आधारे रस्तेकराच्या होणाऱया देवाण-घेवाणीमध्ये 1.35 कोटींची वृद्धी झाली आहे. सरकारने एक जानेवारी 2021 पासून फास्टॅगचा वापर वाहनधारकांसाठी अनिवार्य केला होता. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर हायब्रिड लेन (फास्टॅगसोबत चलनाच्या स्वरुपातही पेमेंट) सुरू ठेवली आहे.
वाढीचा दर
फास्टॅगच्या आधारे रस्तेकर संकलन डिसेंबर 2020 मध्ये 201 कोटी रुपयांनी वधारुन 2,303 कोटी रुपयांवर पोहोचले होते. जे नोव्हेंबर 2020 मध्ये 2,102 कोटींवर होते. महिन्याच्या आधारे डिसेंबरमध्ये 1.35 कोटीपेक्षा अधिकची देवाण-घेवाण केली आहे.









