तालुक्यातील नेवरे येथील घटना
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबटय़ा अडकला होता. वनविभागाला याची खबर मिळताच त्याची फासकीतून सुखरूप सुटका करण्यात आली, आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला.
26 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे बिबटय़ा फसकीत अडकलेला होता. त्याची खबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भ्रमणध्वनी वरून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना 5.30 वाजताच्या दरम्यान दिली. खबर मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व त्यांच्या पथकाने तात्काळ नेवरे येथे जावून खात्री केली. त्यावेळी पथकाला बिबटय़ा फसकीत अडकलेला दिसून आला.
फासकीत अडकलेल्या त्या बिबटय़ाला सोडविण्यासाठी वनविभागाच्या पथकाने लगेचच प्रयत्न सुरू केले. कटर च्या सहाय्याने फसकी तोडून बिबटय़ाची सुखरूप सुटका करण्यात आली. बिबटय़ास पिंजऱयात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांचे कडून तपासणी करून घेतली. त्यानंतर त्या बिबटय़ास नैसर्गिक अधिवासात सोडले. हे रेस्क्यू ऑपरेशन हे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीमती प्रियंका लगड, वनपाल पाली गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकदेवी म.ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी श्रीमती मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले, सा. रं. पताडे यांनी पार पाडली.









