बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये होणारी ड्रग्स विक्री आणि सेवन प्रकरणी सीसीबी कडून कारवाई सुरु आहे. यातच उत्तर कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील एका फार्महाऊसमधून बेंगळूर पोलिसांनी चार ड्रग विक्रेत्यांना अटक केली असून त्यांच्याकडून १३ क्विंटल गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजा प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये भरला होता आणि फार्महाऊसमधील जमिनीमध्ये दफन करण्यात आला होता.









