प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक स्टेट फार्मसी कौन्सिल, बेळगाव डिस्ट्रिक केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, बेळगाव सिटी केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशन व बेळगाव डिस्ट्रिक रेटेल केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वर्ल्ड फार्मासिस्ट डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वैभवनगर येथील राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेज येथे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला कर्नाटक स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष गंगाधर यावगल, राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेजचे चेअरमन आर. एम. मादारखंडी, कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार पुजेरी, बेळगाव जिल्हा रिटेल केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत साळुंखे, बेळगाव जिल्हा केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्यामगौडा पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना गंगाधव यावगल म्हणाले, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषध गोळय़ा हे इतकेच काम ड्रगिस्टचे नसते. तर हा एक व्यवसाय असून त्याद्वारे आपण इतरांची सेवा करतो हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येकांनी असोसिएशनमध्ये नोंदणी करून व्यवसाय वाढवावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी ऍफरॉन व नेमप्लेटचे वितरण करण्यात आले. जिल्हय़ातील 1600 हून अधिक असोसिएशनचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.









