ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील मियामी शहरात फायझरची कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरचा 16 दिवसानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ग्रेगरी माइकल असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. माइकल यांनी 18 डिसेंबर रोजी फायझरची कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या हाता-पायावर लाल चट्टे दिसत होते. त्यांच्या प्लेटलेट्सही खूप कमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. 16 दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. लस घेण्यापूर्वी त्यांना कोणताही आजार नव्हता, त्याची प्रकृती उत्तम असल्याचा दावा माइकल यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी केली.
दरम्यान, फायझरचे प्रवक्ते डॉ. ग्रेगरी यांनी म्हटले आहे की, माइकल यांच्या मृत्यूचा फायझरच्या लसीशी थेट संबंध असल्याचे आम्हाला वाटत नाही. त्यांच्या मृत्यूचा तपास सुरू आहे.









