2 वर्षानंतर होणार स्पर्धा, क्रीडापटूंमध्ये उत्साह
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सेंट पॉल स्कूल आयोजित फादर एडी 17 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला मंगळवार दि. 23 पासून सेंट पॉल हॉस्टेल मैदानावर प्रारंभ होत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे कमांडंट कर्नल स्वप्निल व्ही. टी., सेंट पॉल स्कूलचे प्राचार्य फादर साव्हीओ ऍब्रू, उप प्राचार्य सॅबेस्टिन परेरा, मॅनेजर रॉनी डिसोजा आदी उपस्थित राहणार आहेत. प्रारंभी पथसंचलन होईल. पहिल्या दिवशी 5 सामने खेळविण्यात येणार आहेत. सेंट पॉल वि. ज्ञान प्रबोधन यांच्यात उद्घाटनाचा सामना सकाळी 11 वा. खेळविण्यात येणार आहे. दुसरा सामना सेंट झेवियर वि. ज्ञान मंदिर दुपारी 12 वा., तिसरा सामना फिनिक्स वि. चिटणीस यांच्यात दुपारी 1 वा., चौथा सामना सर्वोदय खानापूर वि. भरतेश यांच्यात दुपारी 2 वा., पाचवा सामना केएलएस वि. मराठी विद्यानिकेतन यांच्यात 3 वाजता खेळविण्यात येणार आहे.









