मडगाव/ प्रतिनिधी
मडगाव आरोग्य केंद्रात काल कोविड योद्धा ना लस दिली जात होती. त्यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या काही समर्थकांना घेऊन जो तमाशा केला त्याचा फातोर्डा व मडगाव भाजप तर्फे निषेध करण्यात आला.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक व मडगाव भाजप मंडळ सरचिटणीस नवीन पै रायकर यांनी संयुक्त रित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आमदार विजय सरदेसाई याचा निषेध केला. विजय सरदेसाई यांना भाजप सरकारातून काढल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप दामू नाईक यांनी केला. ते सद्या बेकार असल्याने प्रसिद्धी साठी धडपड करीत असल्याचे श्री. नाईक म्हणाले.
काल मडगाव घ्या आरोग्य केंद्रात वेर्णा औद्योगिक वसाहतीत फार्मास्य?टिकल कंपनीत काम करणाऱया कामगारांना लस दिली जात होती. सरकारने या कलाकारांना कोविड योद्धा म्हणून घोषित केले आहे व त्यांना लसीकरण योजनेत प्राधान्य दिले आहे. हे कामगार औषधे निर्मिती चे काम करतात व आज कोविड महामारीत ते खुप महत्वाचे आहे. हे एखाद्या व्यक्तीला समजणे महत्वाचे आहे.
हे बहुतेक कामगार फातोर्डात व मडगाव राहतात जरी ते वेर्णात काम करीत असले तरी. या कामगारांबरोबरच अन्य कोविड योद्धा ना लस दिली जात होती.
या कामगारांमुळे अन्य लोकांना लस देण्याच्या प्रक्रियेत खंड पडला नव्हता असा दावा ही दामू नाईक यांनी केला. 18 ते 45 वयोगटातील लोकांना यांचं केद्राच्या दुसऱया बाजूला तशी व्यवस्था करण्यात आली होती.
विजय सरदेसाई यांनी जनतेची केवळ दिशाभूल केली असून लोकांना आता सत्य परिस्थिती कळू लागली असल्याचे दामू नाईक म्हणाले.









