प्रतिनिधी /मडगाव
भारतीय जनता पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण देशभर 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान ‘सेवा और समर्पण अभियान’ सुरू करण्यात आले आहे. फातोर्डा मतदारसंघातील भाजपा मंडळाने मोदीजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घोगळ-मडगाव येथील मातृछायेतील मुलींना मिठाई आणि फळे वाटप करून साजरा केला.
मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली फळे आणि मिठाई मातृछायेचे स्थानिक अध्यक्ष सुरेंद्र नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अनुराधा मोघे, छाया म्हापसेकर व समितीचे इतर सभासद उपस्थित होते.
याप्रसंगी दक्षिण गोवा भाजपा अध्यक्ष तुळशीदास नाईक, मंडळाचे सरचिटणीस दिलीप नाईक, उपाध्यक्ष कालिदास वेर्णेकर, नगरसेविका बबिता नाईक, मिलाग्रीना गोम्स, नगरसेवक कामिलो बार्रेटो, सदानंद नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष गजानन करमली, महीला अध्यक्षा आशा गावस, एस. सी. अध्यक्ष राजीव रावणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष झीको फर्नांडिस तसेच भाजप कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मनोहर बोरकर आणि दिलीप नाईक यांनी मोदीजीच्या कार्यासंबधी अवगत करून अभीष्टचिंतन केले. मातृछायेचे अध्यक्ष सुरेंद्र नाईक यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या तर अनुराधा मोघे यांनी आभार मानले.
महिला मोर्चाच्या सहकार्याने संध्याकाळी बोर्डा भागात प्लास्टिक निर्मूलन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर यानी यावेळी प्लास्टिक वापराचे दैनंदिन जीवनात पर्यावरणावर होणाऱया परिणामांसबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्लास्टिकला पर्याय म्हणून उपस्थितांना मोफत कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला अध्यक्ष आशा गावस व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. स्थानिक नगरसेवक कामिलो बार्रेटो, नगरसेविका बबिता नाईक यांची उपस्थिती होती.









